रिझर्व्ह बँकेशी बोलणी सुरु ; नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा होणार – आठवले

टीम महाराष्ट्र देशा : देशातील नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील्या इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोदी सरकारने निवडणूकीपूर्वी केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण केल्या आहेत. नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आम्हाला कोणतेही पैसे दिले नसून यात काही तांत्रिक अडचण येत असल्याचेही आठवले म्हणाले.

रिझर्व्ह बँकेशी याबाबतची बोलणी सुरु असून लवकरच पैसे जमा होतील असं आश्वासन आठवले यांनी दिलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली, पण येत्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येऊ आणि राहिलेल्या तीन ते चार महिन्यात काँग्रेसची हवा काढू असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. पुन्हा देशांत नरेंद्र मोदींची सत्ता आणू आणि नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवू असेही आठवले म्हणाले. सोनवारी सांगलीच्या इस्लामपूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

You might also like
Comments
Loading...