‘चिकू’ विराटच्या टोपणनावा मागचा रंजक किस्सा

विराट कोहली भारतीय क्रिकेट टीम मधला सर्वाधिक चर्चेतला चेहरा. विराट त्याच्या मैदानावरील धडाकेबाज खेळाबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीसाठी नेहमीच प्रकाशझोतात असतो. विराट सध्या चर्चेत आहे तो त्याच्या टोपणनावमुळे. विराटला सर्व क्रिकेटपटू चिकू या नावाने बोलवतात.विराटचे चिकू हे टोपणनाव कसे पडले या मागे एक रंजक किस्सा आहे

Loading...

विराट कोहली १७ वर्षांखालील मुलांच्या स्थानिक स्पर्धेत दिल्लीकडून खेळत होता. त्यावेळी विराट कोहलीची हेअरस्टाईल ही त्याच्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. विराटने त्यावेळी अशापद्धतीने केस कापले होते, की त्याचे कान मोठे दिसायचे. यावरुन विराट एखाद्या सशासारखा दिसतो म्हणत त्याच्या मित्रांनी त्याला ‘चिकू’ हे नाव ठेवलं. आंतराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना विराटने आपले गुण मैदानात दाखवायला सुरुवात केली. एका सामन्यात क्षेत्ररक्षण लावत असताना धोनीने कोहलीला ‘चिकू’ या नावाने हाक मारली आणि यष्टींवर लावलेल्या माईकमुळे पुढे सोशल मीडियावर हे नाव लोकांना समजलं. यामुळे विराटचा चिकू झाला.

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...