भारतीय वंशाचे पिल्लई सिंगापूरच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदी

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे  जे. वाय. पिल्लई यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती  करण्यात आली. जोपर्यंत सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड केली जात नाही तोपर्यंत पिल्लई हे हंगामी राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. टोनी टान केंग याम यांच्या जागी पिल्लई यांची निवड करण्यात आली आहे.

याम यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाल गुरूवारी पूर्ण झाला आहे. पिल्लई हे राष्ट्राध्यक्ष सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्ष सल्लागार परिषदेचे अध्यक्ष किंवा संसदेच्या अध्यक्षांकडे हंगामी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाते.