म्हणून त्यांनी तोडले शहीद जवानाच्या घरचे केबल कनेक्शन

वेबटीम / औरंगाबाद – जम्मू काश्मीरमध्ये पुंछ भागामध्ये पाकिस्तानशी लढताना भारतीय लष्कारातील महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले. ही घटना संपूर्ण देशाभरात पसरली आहे.  मात्र, ही दु:खद घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद नाईक संदीप सर्जेराव जाधव यांच्या घरी लवकर समजू दिलेली नव्हती .

केळगाव पासून जवळच असणाऱ्या गोकुळवाडी वस्ती हे जाधव यांचे कुटुंबीय राहतात. जाधव यांच्या वीर मरणाची बातमी काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी पोहोचू दिली नव्हती. यासाठी गावातील तरुणांनी जाधव यांच्या वस्तीवर असलेल्या टीव्हीचे केबल कनेक्शन बंद केले. आज सकाळपासून त्यांच्या घराजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर तरुण उभा आहेत. कोणी नातेवाईक आला तर त्याला त्या ठिकाणाहून परत पाठवले जात आहे. जवळचे नातेवाईक आहेत त्यांना फोन करून याबतची कल्पना दिली गेली आहे. अंत्यविधीची तयारी करण्यासाठी पोलीस अधिकारी गावात पोहोचले आहेत. मात्र त्यांनाही वस्तीवर जाऊ दिलेले नाही. त्यासाठी लागणारी व्यवस्था गावकरी करत आहेत. संदीप जाधव यांच्या मृत्यूची घटना घडली त्यावेळी त्यांची आई मावशीकडे गेली होती. त्यांना पीक विम्याचे बँकेत पैसे मिळत आहेत, असे सांगून घरी आणण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप जाधव याचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे. जम्मूमधील पुंछ विभागात पाकिस्तानी लष्कराच्या बॅट तुकडीने गुरुवारी हल्ला केला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या हल्ल्यात बॅटचा एक सैनिक ठार झाला, तर एक सैनिक जखमी झाला. यात महाराष्ट्रातील श्रवण माने आणि संदीप जाधव दोन जवानांना वीरमरण आले.

You might also like
Comments
Loading...