या गावाने दिले भारत मातेला शूर सुपुत्र

सात-सात वर्षाच्या अंतराने जवान शहीद

औरंगाबाद- जम्मू काश्मीरमध्ये पुंछ भागामध्ये पाकिस्तानशी लढताना भारतीय लष्कारातील दोन जवान शहीद झाले. हे दोन्ही शहीद जवान महाराष्ट्रामधील आहेत. यातील संदीप सर्जेराव जाधव हे औरंगाबादच्या केळगावचे रहिवासी.

जाधव ज्या गावचे रहिवासी आहेत त्याच केळगावच्या  दोन जवानांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे. जाधव हे आता तिसरे वीरसुपुत ठरले आहेत. यापूर्वी 2003 मध्ये माधवराव नारायण गव्हांडे, तर 2010 मध्ये काळूबा बनकर यांना सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झाली होती. आता काश्मीरमधील पुंछ भागामध्ये पाकिस्तानशी लढताना संदीप जाधव हे शहीद झाले.

केळगावमधील गोकुलवाडी वस्ती येथे जाधव यांचे कुटूंब राहते. जाधव यांच्या कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह आहे. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी भाऊ. भावजय. एक तीन वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे.