भारताची पाकिस्तानला ऑफर, सफेद झेंडा घेऊन या दहशतवाद्यांचा मृतदेह घेऊन जा

blank

टीम महाराष्ट्र देशा- सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याबरोबरच घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. यात स्थानिक नागरिकांचाही सहभाग असल्याने सुरक्षा दलाने दहशतवादाविरोधात ठोस पाऊल उचल्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांविरोधात हिंदुस्थानने कडक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने पाकडे चांगलेच हादरले आहेत.

काल काश्मीरमध्ये भारतीय बहाद्दर जवानांनी मोठ यश मिळविल आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांची तळे उध्वस्त करत ७ ते ८ दहशतवाद्यांना ठार केले आहे. या कामगिरीमुळे दहशतवाद्यांचा मोठा प्लान फसला आहे.

दरम्यान, भारतीय जवानांकडून मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तान एलओसी पडून आहेत. भारतीय लष्कराकडून हे मृतदेह पाकिस्तान सेनेला घेऊन जाण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. भारताने सांगितले आहे की, पाकिस्तानी लष्कराने सफेद झेंडा घेऊन हे मृतदेह घेऊन जावेत. मात्र अद्याप पाकिस्तानकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.

३१ जुलै आणि १ ऑगस़्टदरम्यान पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीर येथे असणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या चौक्यांना निशाणा करण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेजारी राष्ट्राकडून करण्यात आलेल्या घुसखोरीचं भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या कारवाईत ४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तर, नियंत्रण रेषेनजीक सक्रीय असणाऱ्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातही सैन्यदलाला यश आलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

भारतीय सैन्याला मोठं यश, POK मध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ केले नष्ट

‘कार्यकर्त्यांनो पवार साहेबांची साथ सोडू नका’ आठवलेंची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना साद

सवलती नको आरक्षण मिळालं पाहिजे; धनगर समाज महासंघाची मागणी