भारतीय जवान मारतात रोज पाच-सहा दहशतवादी; राजनाथ सिंह

टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांकडून रोज पाच ते सहा आतंकवाद्यांना कंठस्नान घातले जात असल्याच गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितलं आहे. तर पाकिस्तानच्या कुरापतीना जशाच तस उत्तर देण्याचे आदेश देण्यात आल्याचही त्यांनी सांगितलं.

डोकलाम विषयावर देखील राजनाथ सिह यांनी भाष्य केले ‘भारत हा एक मजबूत देश असून डोकलाम समस्येच निकारण कसे केले हे जगान पाहिलं आहे. जर भारत दुर्बल देश असता तर चीनशी समस्येचे निराकरण करण्यास अपयशी ठरला असता’ भारत आता एक सामर्थ्यशाली देश झाला आहे. तसेच चीनविरुद्धचा वाद संपुष्टात आणण्यासाठी भारत समर्थ असल्याचही गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.