fbpx

इंडियन आर्मीची पाकिस्तानला भीती, संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली भारताची तक्रार

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सबंध देशातून निषेध व्यक्त केला जात आहे. या आत्मघातकी हल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे सामाजिक स्तरातून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. तर भारताच्या नागरिकांकडून बदला घ्या अशी मागणी होत आहे. जगभरातून भारताला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने स्वतःच्या बचावासाठी चक्क संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली आहे.

आज पाकिस्थानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र खान यांची पत्रकार परिषद होण्याआधी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली. आमच्याविरुद्ध भारताकडून मिलिट्री पॉवरचा वापर केला जाऊ शकतो, अशी तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाच्या सचिवांकडे केली आहे.

दरम्यान,या पत्रकार परिषदेत खान यांनी पाकिस्तानचा बचाव केला. हिंदुस्थानशी चर्चा करताना त्यांचा पहिला आग्रह दहशतवादावर चर्चा करण्याचा असतो, त्यामुळे चर्चा थांबते. पण हा नवा पाकिस्तान आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादावर चर्चेस तयार आहोत, असे इमरान खान म्हणाले. त्यामुळे पाकिस्तान युद्धाला घाबरला आहे हे स्पष्ट दिसत होते. मात्र पाकिस्तानी जनतेला आणि लष्काराला धीर देण्यासाठी म्हणून त्यांनी भारताने हल्ले केल्यास प्रतिकार करू, अशा पोकळ धमक्या देखील त्यांनी दिल्या आहेत.