देशाला ७ वाजता मिळणार मोठी बातमी ; तिन्ही दलांची होणार संयुक्त पत्रकार परिषद

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदल आणि हवाईदलाची होणारी संयुक्त पत्रकार परिषद दोन तास पुढे ढकलण्यात आली आहे. या आधी ही पत्रकार परिषद पाच वाजता होणार होती, त्या ऐवजी आता ही पत्रकार परिषद सात वाजता होणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याच्या ताब्यात असलेला विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची शुक्रवारी सुटका करणार असल्याचं जाहीर केल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे.