fbpx

भारताने तिसरा सामना जिंकून मालिका घातली खिशात

टीम महारष्ट्र देशा : माऊंट मोनगानुई येथे झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एक दिवसीय सामना भारताने जिंकून मालिका देखील जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडच्या मैदानावर सलग तीन सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने भारताला टेलर ९३ आणि लॅथम ५१ च्या जोरावर २४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारताने हे लक्ष्य सहज गाठले आहे. भारताने हा सामना ७ विकेट ने जिंकला असून मालिका देखील खिशात घातली आहे.

प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज भारतीय गोलांदाजां समोर पुन्हा एकदा अपयशी ठरले. मार्टिन गुप्तील, कॉलीन मुन्रो आणि कर्णधार केन विलियम्सन यांना झटपट माघारी पाठवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. रॉस टेलर व टॉम लॅथन यांनी ११९ धावांची भागीदारी करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. टेलर (९३) , तर लॅथम (५१) धावांवर बाद झाले. भारताकडून मोहमद शमी याने न्यूझीलंडचे ३ गडी बाद केले तर भुवनेश्वर , चहल , पंड्या या तिघांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. टेलर आणि लॅथम यांच्या संयमी खेळीमुळे न्यूझीलंड संघ २०० धावांचा आकडा पार करू शकला.

न्यूझीलंड ने भारताला 243 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताच्या सलामी वीरांनी चांगली सुरवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवनची भागीदारी होताच शिखर धवन २८ धावांवर झेल बाद झाला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रोहित शर्मा यांनी आपली अर्धशतके पूर्ण करत संघाला विजयाच्या पायऱ्या सहज गाठून दिल्या. कोहली (६०) आणि रोहित (६२) बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक (३८) आणि अम्बाती रायडू (४०) यांनी नाबाद राहून संघाला विजय संपादन करून दिला. भारताच्या या बलाढ्य फलंदाजांना बाद करण्यात न्यूझीलंडच्या बोल्ट आणि मिशेल या दोन गोलंदाजांना यश आले. बोल्टने २ तर मिशेल ने 1 गडी बाद केला.

भारताने ५ सामन्यांच्या या मालिकेत ३ – ० अशी आघाडी घेवून ही मालिका जिंकली आहे.

1 Comment

Click here to post a comment