पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ४ विकेट्सने विजय

टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाने वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.

वेस्ट इंडीजने भारताला विजयासाठी २० षटकात ९६ धावांचे लक्ष दिले होते. हे लक्ष भारतीय संघाने सावध खेळ करत पार करत विजय मिळवला. भारताच्या विजयात रोहित शर्माने २४ तर विराट कोहली आणि मनीष पांडे यांनी प्रत्येकी १९ धावांचे योगदान दिले. तसेच रवींद्र जडेजा आणि सुंदर यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Loading...

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खूप खराब झाली. त्यांच्या सलामीवीरांना फारशी चमक दाखवता आली नाही. अनुफ्हावी पोलार्डने एक बाजू लावून धरत ४९ धावांची खेळी केली. तर निकोलस पुरणने २० धावा केल्या. टीम इंडियाकडून पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारलाही २ विकेट मिळाल्या. तसेच सुंदर, अहमद, पांड्या, जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, या दोन्ही संघांची पुढची लढत आज होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे. तर वेस्ट इंडीज आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज ठाकरे यांनी पक्षवाढीवर लक्ष केंद्रीत करावे, रामदास आठवलेंचा प्रेमाचा सल्ला

देव महान आहे, न्यायाचा विजय झाला : विजय मल्या

राज्य परिवहन महामंडळात महिलाराज, चालक- वाहक म्हणून दिडशे महिलांची नियुक्ती

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली