टीम इंडियाचा द. आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत विजय

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दिलेल्या ३९५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांनी नांगी टाकली. त्यांचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला.

भारताकडून मोहम्मद शमिने ५ तर रवींद्र जडेजाने ४ गडी बाद केले. आफ्रिकेकडून पीटने अर्धशतकी खेळी केली. तसेच पहिल्या डावात आर अश्विनने ७ गडी बाद केले होते. भारतीय गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे हा विजय मिळवण्यात यश मिळाले.

तत्पूर्वी पहिल्या डावात रोहित शर्मा १७६ धावा, तसेच त्याचा सहकारी मयंक अग्रवालने द्वीशतक झळकावले होते. या दोघांच्या खेळीने भारताने आपला पहिला डाव ५०२ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर आफ्रिकेने चिवट फलंदाजी करत ४३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने रोहित शर्माच्या दुसऱ्या डावातील शतकी खेळीने ३२३ धावांवर डाव घोषित करत आफ्रिकेला ३९५ धावांचे लक्ष दिले होते.

महत्वाच्या बातम्या