fbpx

तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा विजय; कोहली, पंतची फटकेबाजी

टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवत तीन टी20 सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. टीम इंडियाच्या विजयात विराट कोहली, रिषभ पंत आणि दीपक चाहर यांनी शानदार कामगिरी केली. ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली तर चाहरने ३ षटकांत फक्त ४ धावा देत ३ गडी बाद केले.

वेस्ट इंडीजने दिलेल्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन ३ तर लोकेश राहुल २० धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी डाव सावरला. दोघांनीही अर्धशतके केली. परंतु कोहली ५९ धावांवर बाद झाला. त्यानंतर पंतने मनीष पांडेच्या साथीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रिषभ पंतने नाबाद ६५ धावा केल्या.

तत्पूर्वी वेगवान गोलंदाज दीपक चाहरने शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीनही फलंदाजांना बाद करत वेस्ट इंडिजवर दबाव टाकला. त्यानंतर अनुभवी पोलार्डने डाव सावरला त्याने अर्धशतकी खेळी करत ५८ धावा केल्या. तर टीम इंडियाकडून दीपक चाहरने ३ तर नवदीप सैनीने २ गडी बाद केले. तसेच राहुल चाहरने १ गडी बाद केला.

दरम्यान, ८ ऑगस्ट पासून या दोनही संघामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय सामन्यांतही टीम इंडियाचा अशीच कामगिरी करून मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुख्यमंत्र्यांना वाढता विरोध, हिंगोलीत दाखवले काळे झेंडे

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज काळाच्या पडद्याआड