विंडीजला धूळ चारत टीम इंडियाने घातली मालिका खिशात

टीम महाराष्ट्र देशा- भारत-वेस्ट इंडिज यांच्यात काल झालेला दूसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं ‘डकवर्थ लुईस नियमाद्वारे’ २२ धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं वेस्ट इंडिज समोर जिंकण्यासाठी १६८ धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघानं सोळाव्या षटकांपर्यंत चार बाद ९८ धावा केल्या, मात्र त्यानंतर पाऊस आल्यानं खेळ थांबवावा लागला. परिणामी ‘डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला २२ धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन-शुन्यनं विजय मिळवत ही मालिका जिंकली आहे.

फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विंडीजला पराभूत करून भारताने एक दमदार पराक्रमदेखील केला. भारताने या विजयासह दोन वेळा टी २० विश्वविजेतेपद जिंकलेल्या विंडीजला सलग सामन्यात सर्वाधिक वेळा पराभूत करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताने विंडीजला सलग ५ सामन्यात विंडीजला पराभूत केले. याआधी पाकिस्तानने विंडीजला सलग ५ सामन्यात पराभूत केले होते.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी -२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे. टी-२० कारकिर्दीतील ९६ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने हा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या टी-२० सामन्यात विंडिजचा स्पिनर सुनील नरेनच्या चेंडूवर सामन्यातील दुसरा षटकार लगावून सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू होण्याचा मान त्याने पटकावला. या सामन्यात त्याने त्याचं १७ वं अर्धशतकही ठोकलं. त्याने टी-२० मध्ये आतार्यंत १०७ षटकार ठोकले आहेत, तर गेलने १०५ षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे गेलने रोहितच्या तुलनेत कमी म्हणजे ५७ टी-२० सामने खेळले आहेत.

विजय भारताचा पण फायदा मात्र पाकिस्तानचा!

मराठमोळ्या अनुजा पाटीलकडे महिला क्रिकेट संघाची धुरा