भारत ‘चंद्रयान-२’ मोहीम जुलैमध्ये अवकाशात पाठविणार

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याची ‘चंद्रयान-2’ मोहीम ९ जुलै ते १६ जुलै दरम्यान एका दिवशी अवकाशात सोडली जाणार आहे.

ही मोहीम भारताच्या GSLV-मार्क-३ या सर्वात शक्तिशाली अग्निबाणाने सोडली जाईल. या मोहीमेचे तीन भाग असतील, ज्यात एक ऑर्बिटर, ‘विक्रम’ नावाचे एक लँडर आणि ‘प्रज्ञान’ एक रोव्हर असेल.

लँडर ६ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवले जाईल. भारताच्या बहुलक्षीय मोहिमांपैकी एक अशी ही ‘चंद्रयान २’ ही मोहीम भारतीय संशोधन क्षेत्रात बहुमूल्य योगदान देईल याबद्दल काहीही दुमत नाही.