टेन्शन घेऊ नका, अमित शहांमुळे टीम इंडिया वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात खेळणार : अब्दुल्ला

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली. या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. कारण सेमीफायनलमध्ये विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया स्पर्धेबाहेर पडले आहेत.

टीम इंडिया जरी वर्ल्ड कपच्या बाहेर पडली असली तरी अमित शहांच्या कृपेने अंतिम सामन्यात खेळणार असल्याची मजेशीर टिप्पणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी केली आहे. त्यांनी ‘मला सध्या व्हॉटसअॅपवर फिरत असलेल्या संदेशांपैकी एक संदेश खूपच आवडला. यामध्ये म्हटले आहे की, न्यूझीलंडच्या नऊ खेळाडूंचा राजीनामा, टीम इंडियात प्रवेश. अमित शहा म्हणाले, भारत अंतिम सामन्यात खेळणार, अशा आशयाची ही टिप्पणी आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार अडचणीत आले आहे. या सगळ्यापाठी भाजप असल्याचा आरोप मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी केला होता. तर दुसरीकडे गोव्यातही भाजपने काँग्रेसचे १० आमदार फोडले होते. त्यामुळे अब्दुल्ला यांनी अशी टिप्पणी