द. आफ्रिकेची कांगारूंवर मात, भारताचा सेमीफायनलमधील प्रतिस्पर्धी संघ ठरला

नवी दिल्ली : शनिवारी मँचेस्टर येथे पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव केला. परिणामी श्रीलंकेवर मात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवलं आहे.

Loading...

यामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये सामना ९ जुलैला निश्चित झाला असून चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडसोबत पुन्हा टक्कर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची टक्कर यजमान इग्लंडसोबत होणार आहे. हा सामना ११ जुलै रोजी खेळविला जाणार आहे.Loading…


Loading…

Loading...