भारतात आणखी दोन-तीन महिने लसींचा तुटवडा जाणवणार : अदर पुनावाला

adar poonawala

नवी दिल्ली- देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली असून देशात दररोज रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा देखील कार्यक्रम सुरु आहे. मात्र सध्या देशभरात अनेक ठिकाणी करोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा भासू लागला आहे.यातच आता जुलै महिन्यापर्यंत लसींची कमतरता भासू शकते असं सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.अदर पुनावाला म्हणाले की, जुलै महिन्यापर्यंत लसींचं उत्पादन ६० ते ७० मिलियनपासून १०० मिलियनपर्यंत वाढू शकतं.

पुनावाला म्हणाले की जानेवारीमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यावर त्यात पुन्हा वाढ होऊन करोनाची दुसरी लाट येईल असं वाटलं नव्हतं. सगळ्यांनाच वाटत होतं की भारताने या महामारीवर मात करायला सुरुवात केली आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टाईम्स’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

महत्त्वाच्या बातम्या