भारत करणार युरोपियन युनियनसह अमेरिकेबरोबर मुक्त व्यापार करार !

flag

नवी दिल्ली: जागतिक बाजापेठेत व्यापार करण्यासाठी युरोपियन युनियन एक महत्वाची संघटना मानली जाते. तर चीन सारखा देश जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करू पाहत असताना भारताने २०१२ पासून युरोपियन युनियन आणि अमेरिकेबरोबर मुक्त व्यापार करार केला नाही. मात्र, लवकरत भारत हा मुक्त व्यापार करार करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारपुढे प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) कराराचाही पर्याय असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जगभरात चीनविरोधातील भावना वाढीला लागली असताना त्याचा फायदा भारताला होऊ शकतो, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अर्थव्यवहारावर बोलताना भाजपचे प्रवक्ते गोपाळकृष्ण अग्रवाल म्हणाले, की आम्ही युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी आशावादी आहे. हा करार भारताला फायदेशीर ठरणार आहे. लवकरच चर्चा सुरू होणार आहे. आम्ही इतर देशांबरोबर व्यापार करार करण्यासाठी विरोध केला नाही. मात्र जागतिक आणि प्रादेशिकदृष्ट्या एकत्र राहण्याची गरज आम्ही समजू शकतो, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

तर युरोपियन अर्थव्यवस्थेला नवीन संधीची गरज आहे. त्यामधून कोरोनाच्या संकटानंतर उर्जा पूर्ववत मिळविणे शक्य होईल. भारताने वेळ दवडू नये. भारताने इतर देशांपूर्वी तातडीने कृती केली पाहिजे, असे मत भारतीय निर्यात संघटनेचे अध्यक्ष एस. के. सराफ यांनी व्यक्त केले आहे. युरोपियन युनियन ही भारताच्या व्यापारी भागीदारीमधील सर्वात मोठी भागीदार आहे. भारताच्या एकूण व्यापारापैकी ११.१ टक्के व्यापार युरोपियन युनियनबरोबर होतो. असे युरोपियन आयोगाचे अध्यक्ष उरसून व्होन डेर लियेन यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या