टीम इंडियाचा 9 विकेटने ‘शानदार’ विजय, मालिकेवरही केला कब्जा

टीम महाराष्ट्र देशा- विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना भारताने विंडीजला 9 गडी राखून जिंकले आणि विंडीजविरुद्ध भारताने हा सलग आठवा मालिका विजय नोंदवला. विंडीजचा डाव अवघ्या 104धावांत गुंडल्यानंतर भारताने हे आव्हान 15षटकाच्या आत पूर्ण केले. रवींद्र जाडेजाच्या अप्रतिम फिरकीच्या जोरावर भारताने विंडीजला 104रोखले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिका 3-1ने खिशात घातली.

भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि त्यांचा फक्त 104 धावांत खुर्दा उडवला. भारताकडून रवींद्र जडेजाने यावेळी सर्वाधिक चार बळी मिळवले. वेस्ट इंडिजच्या 105 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने यावेळी नाबाद 63 धावांची दमदार खेळी साकारली. कोहलीने यावेळी नाबाद 33 धावा केल्या.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...