टीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताचा अंतिम संघ जाहीर,पृथ्वी शाॅ करणार पदार्पण

टीम महाराष्ट्र देशा- भारत विरुद्ध विंडीज दोन कसोटी सामन्यांतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी १२ खेळाडूंचा संघ आज घोषीत करण्यात आला. या सामन्यात १८ वर्ष ३२८ दिवस वय असलेला पृथ्वी शाॅ पदार्पण करणार आहे.त्याला सलामीवीर म्हणुन संघात स्थान देण्यात आले असुन मयांक अग्रवालला पदार्पणासाठी वाट पहावी लागणार आहे.

पृथ्वी शॉ ला संघात संधी मिळाल्यामुळे मयांक अग्रवालचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. तसेच मोहम्मद सिराजला देखील अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. संघात ३ वेगवान गोलंदाजांनाही स्थान देण्यात आले आहे.

पृथ्वी शॉच्या निवडीनंतर उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे याने आनंद व्यक्त केला आहे. ‘पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी त्याला अगदी लहान असल्यापासून खेळताना पाहतो आहे. आम्ही नेटमध्ये एकत्र सराव केला आहे. तो आक्रमक सलामीवीर आहे. त्याची भारत अ संघातील कामगिरी अत्यंत उल्लेखनीय होती. त्याचेच फळ त्याला मिळाले आहे, अशा शब्दात रहाणेने त्याचे कौतुक केले.

१२ खेळाडूंचा संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर

अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात एन्ट्री