वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही भारत विजयाच्या उंबरठ्यावर

टीम महाराष्ट्र देशा- यजमान वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. जमैका इथं सुरु असलेल्या या सामन्यात भारतानं इंडिजला विजयासाठी ४६८ धावांचं आव्हान दिलं आहे. तिसऱ्या दिवसा अखेर या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं दोन बाद ४५ धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा पहिला डाव ११७ धावात संपुष्टात आला. त्यानंतर भारतानं फॉलोऑन न देता दुसरा डाव सुरू केला, चार बाद १६८ धावा केल्यानंतर भारतानं दुसरा डाव घोषित केला. यामुळे विजयासाठी ४६८ धावा करण्याचं इंडिजला आव्हानं मिळालं.

विंडिजचा दुसरा डाव सुरू होताच सलामीला आलेल्या क्रॅग ब्रेथवेटच्या विकेटने विंडीजला पहिला धक्का दिला. इशांतने हा विकेट घेतला. दुसरा गडी मोहम्मद शमीने बाद केला. जॉन कॅम्पबेलचा झेल कर्णधार विराट कोहलीने टिपला.