भारत-वेस्ट इंडिज आज भिडणार

टीम महाराष्ट्र देशा- विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिल्यावर आता भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी- २० विश्‍वकरंडक डोळ्यासमोर ठेवून तयारीला सुरवात करेल. नवी स्वप्ने, नवी आव्हाने यांचा सामनाच भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात करणार आहे. या वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरवात आजपासून सुरू होणाऱ्या टी- २० क्रिकेटच्या थराराने होईल.

या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांना एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र भारताला आपली मधली फळी भक्कम करायची असेल तर या दोघांना संधी द्यावी लागणार आहे. या सामन्यात राहुल आणि दीपक चहर या भावांना संधी मिळते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे कार्लोस ब्राथवेटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघांत केरन पोलार्ड, सुनील नरेन यांसारखे वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू आहेत. तर, गोलंदाजीमध्ये वेस्ट इंडिजकडे शेल्डन कॉट्रेल आणि ओशेन थॉमस यांसारखे खेळाडू आहेत.

महत्वाच्या बातम्या 

अशी असणार टीम इंडियाची नवी जर्सी ; बीसीसीआयकडून फोटो शेअर

व्हिटोरीच्या मते टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू आहे सर्वात घातक

पुण्यात लक्ष्मी चौकात ६ दुकानांना भीषण आग

मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो, रोहितचे खळबळजनक ट्विट