india vs srilanka- दुसऱ्या दिवशी भारताची कसोटीवर मजबुत पकड

r ashwin

वेबटीम-(स्वप्नील कडू )- भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्याकसोटी च्या दुसरा दिवस पुन्हा भारतीय फलंदाजाच्या नावावर राहिला.आजच्या खेळा ची सुरवात झाल्यावर पुजारा आज फक्त 5 धावांची भर घालून 133 धावांवर बाद झाला.त्यानंतर रहाणे आणि अश्विन यांनी शानदार खेळ सुरू ठेवला.रहाणे 132 धावांची शानदार खेळी करून पुष्पकुमाराचा बळी ठरला.अश्विन व साहा यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करत अर्धशतके झळकावले. अश्विनने आपल्या कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक आज झळकावले. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा शानदार खेळ करत भारताला 600 चा टप्पा पार करून दिला.अश्विन बाद झाल्यावर जडेजा व साहा यांनी भारताला अर्धशतकी भागीदारी करत 600 धावांचा टप्पा पार करण्यात मोलाची भूमिका बजावली.622 धावांवर भारताने आपला डाव घोषित केला.


श्रीलंकेच्या डावाची सुरवात निराशाजनक झाली.थरांगा व करुणारत्ने दोघेही अश्विनच्या गोलंदाजीचे शिकार ठरले.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकेच्या 2 बाद 50 धावा झाल्या होत्या .भारताने दुसऱ्याच दिवशी सामन्यावर मजबुत पकड बनवली आहे.श्रीलंकेला हा सामना व मालिका वाचवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

*दृष्टीक्षेपात विक्रम*
1.आर अश्विनने आज 2000 धावांचा टप्पा पार केला .कसोटीत 2000 धावा व 200+ विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विनचा चौथा क्रमांक लागला.


2.कसोटीत श्रीलंकेत खेळताना सलग दोन कसोटीत 600+ धावा करणारा भारत पहिला देश ठरलाय.

3.एका वर्षात कसोटीत 4 वेळा 600+ धावा करण्याचा विक्रम भारताने दुसऱ्यांदा केला.यापूर्वी भारताने 2007 साली असा विक्रम केला होता.