भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा !

virat kohli

स्वप्नील कडू- श्रीलंकेविरुद्ध २० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. पहिला सामना श्रीलंकेतील डम्बुला येथे तर शेवटचा सामना कोलंबो येथे होणार आहे. 2019 च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने संघ बांधनिस सुरवात झाली असून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. युवराज सिंग, आर.अश्विन, जडेजा, उमेश यादव व मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. दिनेश कार्तिक व ऋषभ पंत यांना संघात स्थान देण्यात आले नाही.
             रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले असून उपकर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह, मनीष पांडे आणि के एल राहुल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. भारताला श्रीलंके विरोधात 5 एकदिवसीय व एक 20-20 सामना खेळायचा आहे.

Loading...

एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, 

भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:

२० ऑगस्ट – पहिली वनडे डम्बुला

२४ ऑगस्ट – दुसरी वनडे कँडी

२७ ऑगस्ट – तिसरी वनड कँडी

३१ ऑगस्ट – चौथी वनडे कोलंबो

३ सप्टेंबर – पाचवी वनडे कोलंबोLoading…


Loading…

Loading...