fbpx

भारत व श्रीलंका कसोटी: भारतीय फलंदाजांची हुकूमत

वेबटीम- (स्वप्नील कडू)  भारत व श्रीलंका यांच्यात नागपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसावर भारतीय फलंदाजांनी हुकूमत गाजवली. कालच्या नाबाद असलेल्या कोहली व पुजारा यांनी आजच्या डावाची आश्वासक सुरवात केली. पुजारा 143 धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहित व विराट यांनी शानदार खेळ करत डाव पुढे सुरू ठेवला. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 5 वे द्विशतक यावेळी ठोकले. रोहित शर्माने 4 वर्षानंतर कसोटी शतक झळकावले. सहावा फलंदाज म्हणून संधी मिळालेल्या रोहित शर्माने कसोटीतील 3 रे शतक यावेळी झळकावले.
भारताने 610 धावांवर आपला डाव घोषित केला.श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली.इशांत शर्माने समरविक्रमाला बोल्ड करून बाद केले. आजचा खेळ संपला तेव्हा लंकेच्या 1 बाद 21 धावा झाल्या होत्या.

आजचे विक्रम:
कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक झळकावन्याच्या बाबतीत लाराच्या 5 द्विशतकांशी कोहलीने बरोबरी केली.यावेळी कोहलीने ब्रॅडमन क्लार्क पॉंटिंग यासारख्या महान खेळाडूंना पाठीमागे टाकले.

भारतात 3000 कसोटी धावा सर्वात कमी डावात करण्याचा विक्रम यावेळी पुजाराने आपल्या नावे केला.पुजाराने 53 डावात हा विक्रम करत सचिनचा 55 डावाचा विक्रम मागे टाकला.