भारत व श्रीलंका दुसरा कसोटी सामना

उद्यापासून भारत व श्रीलंका यांच्यात सिहली स्पोर्ट ग्राउंड कोलोम्बो येथे दुसऱ्या कसोटीस प्रारंभ होत आहे.पहिल्या कसोटीत मिळवलेल्या धडाकेबाज विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे.भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे.भारतीय कसोटी संघ हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम संघ आहे.भारतीय संघात सध्या प्रत्येक जागेसाठी कमालीची चुरस आहे.उद्या के ऐल राहुल आजारपणानंतर पुनरागमन करणार असून अभिनव मुकुंदला बाहेर बसावे लागणार आहे.अभिनव मुकुंदने दुसऱ्या डावात शानदार 81 धावांची खेळी केली होती.उद्याचे मैदान फिरकीला साथ देणारे असण्याची शक्यता आहे त्यामुळे हार्दिक पंड्याच्या जागी कुलदीप यादवची वर्णी लागण्याची शक्यता आहे.उद्याच्या सामन्यात चेतेश्वर पुजारा आपल्या कसोटी कारकिर्दीतील 50 वा सामना खेळणार आहे त्यामुळे पुजारावरही सर्वांच्या नजरा असणार आहे.पुजारा आज नक्कीच भारतीय कसोटी संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे .Loading…
Loading...