दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला

वेबटीम-स्वप्नील कडू : भारत व श्रीलंका यांच्यात कोलोम्बो येथे सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांच्या नावावर राहिला.आजारपणानंतर पुनरागमन करनाऱ्या के एल राहुलने धवनसोबत डावाची छान सुरवात केली.दोघांनी 56 धावांची सलामी दिली.धवन 35 धावा काढून बाद झाला.राहुलने आज आपल्या सलग सहाव्या डावात अर्धशतक झळकावले. भारतातर्फे असे करणारा तो द्रविड व गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर तिसरा खेळाडू ठरला आहे.57 धावांवर असताना राहुल दुर्दैवीरित्या धावबाद झाला.
आपला 50 वा कसोटी सामना खेळणारा पुजारा आज पूर्ण बहरात होता.आपल्या कसोटी कारकिर्दीतील 13 वे शतक पुजाराने झळकावले. आजच्या खेळीत पुजाराने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.कसोटी कारकिर्दीतील 4000 धावा पुजाराने पूर्ण केल्या.भारतातर्फे असे करणारा तो तिसरा वेगवान खेळाडू ठरला आहे.दुसऱ्या बाजूने अजिंक्य रहानेनेही शानदार शतक झळकावले. रहाणेचे हे कसोटीतील 9 वे शतक झळकावले. आजचा खेळ संपला तेव्हा पुजारा नाबाद 128 व रहाणे 102 धावांवर खेळत होते.आजचा खेळ संपला तेंव्हा भारताच्या 3 बाद 344 धावा झाल्या होत्या.