रोहित शर्माचा नाद खुळा ; खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना घातली गवसणी

टीम महाराष्ट्र देशा- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आक्रमक सुरुवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारली आहे.रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली.

तर दुसरीकडे मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत.

कसोटीतल्या सलामीतही आपण शतकी सलामी ठोकू शकतो हे दाखवून देत तो ही ‘कसोटी’ही उत्तीर्ण झाला.तो सलामीवर म्हणून कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी -20 या तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. याआधी कोणात्याही भारतीय सलामीवीराला या तीनही प्रकारात शतके करता आली नव्हती. पण रोहितने हा कारनामा आज केला आहे.रोहितने आत्तापर्यंत सलामीवीर म्हणून वनडेत 25 शतके केली आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी -20मध्ये सलामीवीर म्हणून 4 शतके केली आहेत.

महत्वाच्या बातम्या