आज आशिया कप टी-20 मध्ये India vs Pakistan क्रिकेट सामना रंगात आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघ हा मजबूत संघर्ष उतरला आहे. नवीन महिला क्रिकेट खेळाडूंना संधी देऊ देखील मागील सामना भारताने जिंकला. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताने महिला संघात एकूण 8 बदल केले. यामध्ये त्यांनी आपल्या द्वितीय श्रेणीतील खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. गुरुवारी थायलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. तर भारताविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी पाकिस्तानला या पराभवातून सावरण्याची संधी मिळू शकते.
भारतीय महिला क्रिकेट टीम
भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या टॉप प्लेयर सह पाकिस्तानला झुंज देण्यासाठी तयार आहे. यामध्ये स्मृती मानधना, सबिनेनी मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, रिचा घोष (डब्ल्यूके), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका सिंग आणि राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे.
पाकिस्तान महिला क्रिकेट टीम
तर पाकिस्तान महिला क्रिकेट संघामध्ये मुनीबा अली, सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दार, आयशा नसीम, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, डायना बेग, तुबा हसन, नशरा संधू या खेळाडूंचा समावेश आहे.
India vs Pakistan
महिला आशिया कप T-20 2022 India vs Pakistan हा सामना सुरू झालेला असून तुम्ही तो डिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकता. हा सामना सिलहट इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम येथे सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | “शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- MNS | शिंदेंनी दर्शन न घेतल्याने देवीचं विसर्जन थांबवलं ; “देवापेक्षा CM मोठे झाले का?”; मनसेचा सवाल
- MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amit Thackeray | कोणचा दसरा मेळावा पाहिला?, अमित ठाकरे म्हणाले…
- New Car Launch | Mahindra ची ‘ही’ कार होणार आज लाँच