fbpx

भारत-न्यूझीलंड सामना रद्द होण्याची शक्यता, ६ वाजता होणार पाहणी

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर आज न्यूझीलंडचं आव्हान आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर हा सामना होणार आहे. कालपासून या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार पावसाचा फटका सामन्याला बसत आहे. अद्याप सामना सुरु झाला नसून सायंकाळी ६ वाजता पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर पावसाच्या हलक्या सरी सुरु असल्याने सामना होण्याची शक्यता मावळत चालली आहे. सामना नाही झाला तर याचा फटका भारताला बसू शकतो.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…