India vs England: हार्दिकच्या पाच विकेट्स, भारत मजबूत स्थितीत

टीम महाराष्ट्र देशा – इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 161 धावातच कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात 168 धावांची आघाडी घेतली आहे.भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने भारताकडून या डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. कसोटीमध्ये पहिल्यांदाच हार्दिकने एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. पुढे इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत गेले.

इंग्लंडचा पहिला डाव 161 धावातच गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावांत 168 धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या दिवस अखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावांत 31 षटकांत सलामीवीर राहुल, धवनचे बळी गमावून भारताने 31 षटकांत 2 बाद 124 धावा केल्या आहेत. दिवसअखेर कर्णधार विराट 8 आणि पुजारा 33 धावांवर खेळत आहेत. भारताकडे आता एकूण 292 धावांची मोठी आघाडी आहे. भारताने दुसऱ्या डावांत धवन 44 आणि राहुल 36 यांचे बळी गमावले.

मनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होतो आहे- जितेंद्र आव्हाड