भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना; भारताचा पहिला डाव अवघ्या 107 धावांत संपुष्टात

लॉर्ड्स :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या कसोटीत सामन्यात भारताने पुन्हा एकदा शरणागती पत्करली. पावसाच्या व्यत्ययामुळे लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ सुरूच होऊ शकला नव्हता. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भातीय भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 107 धावांत संपुष्टात आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. एडबॅस्टन कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाकडून लॉर्ड्सवर पुनरागमनाची अपेक्षा होती, परंतु जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुढगे टेकले.

भारताकडून आर. अश्विन (२९) व कर्णधार विराट कोहली (२३) यांनी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने ५७ चेंडूत २ चौकारांसह २३ धावा केल्या. अजिंक्य रहाणेही (१८) विशेष छाप पाडू शकला नाही. तळाच्या फळीत अश्विनने ३८ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावा करत चांगली झुंज दिली. मात्र तो परतल्यानंतर भारताचा डाव झटपट गुंडाळला गेला.

लॉर्ड्सच्या शंभर वर्षांच्या इतिहासात कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लवकर माघारी परतलेला भारत हा दुसरा संघ ठरला आहे. भारताचा संपूर्ण संघ 35.2 षटकांत माघारी फिरला. यापूर्वी 2000 मध्ये झिम्बाब्वेचा पहिला डाव 30.3 षटकांत गडगडला होता.

विंडिजच्या ब्रेथवेटची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याची तक्रार

बनावट डिग्री प्रकरण : हरमनप्रीत कौरची डीएसपी पदावरुन हकालपट्टी