आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत रवीचंद्रन अश्विन पहिल्या स्थानावर

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली  कामगिरी करणाऱ्या रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. भारताच्या यशस्वी फिरकी जोडीने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे.पहिल्या स्थानावर अश्विन, दुसऱ्या स्थानावर जाडेजा आहेत. अश्विनने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २८ गडी बाद केले , तर जडेजाने २६ गडी बाद केले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर अश्विनच्या नावावर ८८७, तर जाडेजाच्या नावावर ८७९ गुण आहेत.

कसोटी गोलंदाजींच्या क्रमवारी

  1. रवीचंद्रन अश्विन- भारत
  2. रवींद्र जडेजा- भारत
  3. रंगना हेराथ- श्रीलंका
  4. डेल स्टेन- साऊथ आफ्रिका
  5. जेम्स अँडरसन- इंग्लंड
  6. मिशेल स्टार्क- ऑस्ट्रेलिया
  7. जोश हेझलवूड- ऑस्ट्रेलिया
  8. स्टुअर्ट ब्रॉड- इंग्लंड
  9. नील वॅगनर- न्यूझीलंड
  10. यासिर शाह- पाकिस्तान