मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून (१ जुलै) ५वा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर आजपासून दोन्ही संघांमधील गेल्या वर्षीचा शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, देशाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या माजी फलंदाजाने निवडलेल्या ११ खेळाडूंमध्ये पाच फलंदाज, एक यष्टीरक्षक खेळाडू, दोन अष्टपैलू खेळाडू आणि तीन वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे.
वसीम जाफरने शेवटच्या कसोटी सामन्यात शुभमन गिलसह चेतेश्वर पुजाराची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. याशिवाय त्याने मधल्या फळीत अनुक्रमे हनुमा विहारी, माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची निवड केली आहे. याशिवाय जाफरने ऋषभ पंतची संघात यष्टिरक्षक खेळाडू म्हणून निवड केली आहे. तसेच जाफरने दोन खेळाडूंची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केली आहे. यामध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या नावांचा समावेश आहे. जाफरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दुल ठाकूरचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खरे तर शार्दुलने गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली होती.
याशिवाय जाफरने आपल्या संघात तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या नावाचा समावेश आहे. जाफरने बुमराहचा कर्णधार म्हणूनही संघात समावेश केला आहे. याशिवाय त्याने विकेटकीपिंग तसेच उपकर्णधारपदाची जबाबदारी पंतकडे सोपवली आहे.
5व्या कसोटीसाठी वसीम जाफरची प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<