इंग्लंडचा चौथा गडी बाद, जाडेजानं घेतले 3 बळी

चेन्नई कसोटीत ज्यो रूटनं मोईन अलीच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला. दरम्यान जो रुट 88 धावा करुन बाद झाला. त्याला जाडेजानं बाद केलं. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडण्यात भारताला यश आलं.

रवींद्र जाडेजानं अॅलेस्टर कूकला दहा धावांवर माघारी धाडलं. तर ईशांत शर्मानं इंग्लंडचा सलामीवीर कीटन जेनिंग्सला एका धावेवर माघारी धाडून भारतीय संघात आपलं पुनरागमन दणक्यात साजरं केलं.