बांगलादेशला धूळ चारत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! आता पाकसोबत ‘मैदान-ए-जंग’

 हिट मॅन रोहित शर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशचा पराभव करत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी च्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे . भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले रोहित शर्मा आणि विराट कोहली. रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे २६५ रन्सचं आव्हानं भारतानं ९ विकेट राखून पार केलं. रोहित शर्मानं १२९ बॉल्समध्ये नाबाद १२३ रन्सची खेळी केली तर विराटनं ७८ बॉल्समध्ये नाबाद ९६ रन्स केल्या. शिखर धवननं ३४ बॉल्समध्ये ४६ रन्सची खेळी केली.
या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला
बांग्लादेशची इनिंग
सामन्याच्या सुरुवातीला काही वेळ ढगाळ वातावरणाचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला दणके दिले. सलामीवीर सौम्य सरकार भोपळाही न फोडता तंबूत परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सब्बीर रेहमानने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र फटकेबाजी करण्याचा नादात तो देखील जाडेजाच्या हाती झेल देऊन बाद झाला. मात्र यानंतर सलामीवर तमिम इक्बाल आणि यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिम यांनी बांगलादेशचा डाव सावरला. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली.
भारतीय गोलंदाजांकडून हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधव या तिघांनीही बांगलादेशच्या २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. तर रविंद्र जाडेजाला १ बळी मिळाला.
[jwplayer YU3qBemP]