भारताची वेगवान एक्स्प्रेस धावली, तीन बंगला वाघांची केली शिकार

blank

टीम महाराष्ट्र देशा : आजपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे सुरु झाला आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय बांगलादेशचा चांगलच अंगलट आला आहे. पहिल्या सत्रात या सामन्यात भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज उमेश यादव, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी बांगला वाघांना सुरवातीलाच दणके दिले आहेत.

गलादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने नाणफेक गमावली तरी कर्णधार विराट कोहली खूप खूश होता कारण खेळपट्टीवर गवत दिसत होते आणि इतिहास पाहिला तर इंदूरमध्ये पहिल्या दिवशी गोलंदाजीलाच मदत मिळाली आहे.

कोहलीचा अंदाज खरा ठरला आणि भारतीय गोलंदाजांनी सुरवतीलाच बांगलादेशला तीन दणके दिले. उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांनी त्यांचे दोन्ही सलामीवीर बाद केले. तर मोहम्मद शमिने मोहम्मद मिथुनला तंबूत पाठवून भारताला तिसरे यश मिळवून दिले. पहिल्या सत्रात बांगलादेशची धावसंख्या ६३ धावांवर ३ गडी बाद अशी आहे.

महत्वाच्या बातम्या