ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताचा विजय

टीम महाराष्ट्र देशा : कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असा विजय मिळवत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं आपलं अव्वल स्थान अधिक भक्कम केलं आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने अवघ्या तिसऱ्या दिवशी दणदणीत विजय मिळवला आहे. २ कसोटीच्या मालिकेत भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकून ही मालिका २-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताचा गोलंदाज उमेश यादवने ५३ धावा देऊन ५ गडी बाद केले. तर पहिल्या डावात वेगवान गोलंदाज इशांत शर्माने ४ विकेट घेतले होते.

पहिल्या दिवशी गोलंदाजांनी अधिराज्य गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशी विराट कोहलीनं विक्रमी कामगिरी केली. भारतानं दुसऱ्या दिवशी 347 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी बांगलादेशला 6 विकेट गमावत 152 धावा करता आल्या. त्यामुळं भारताकडे 89 धावांची आघाडी आधीच होती.दुसऱ्या दिवशीही या सामन्यावर भारतीय संघाने अधिराज्य गाजवले. सुरुवातीला विराट कोहलीनं फलंदाजीनं कमाल केल्यानंतर गोलंदाजांनीही आपले काम चोख पार केले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...