अवघ्या आठ कसोटीत दोन द्विशतकं : मयांक अग्रवालचा नाद खुळा

blank

टीम महाराष्ट्र देशा : बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४९३ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालचे अडीचशतक अवघ्या काही धावांनी हुकले.

१ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली होती. त्यानंतर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने ४९३ धावा केल्या.आज या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने द्विशतकी खेळी केली आहे.त्याने 303 चेंडूत 25 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने त्याचे हे द्विशतक पूर्ण केले.

मयांक अग्रवालचं हे कसोटीतील दुसरं द्विशतक आहे. यापूर्वी त्याने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्या द्विशत ठोकलं होतं. विशाखापट्टणम कसोटीत त्याने 215 धावा केल्या होत्या. ते त्याचं पहिलंच द्विशतक होतं. अवघ्या आठव्या कसोटीत मयांक अग्रवालने दोन द्विशतक झळकावून आपली चुणूक दाखवून दिली आहे.

महत्वाच्या बातम्या