पॅट कमिन्सने उडवली भारतीय फलंदाजांची दाणादाण, भारताचा निम्मा संघ माघारी

टीम महाराष्ट्र देशा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नच्या तिसरया कसोटी सामन्यात भारताची सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होती पण ऑस्ट्रेलिया ने मात्र ही वाट सोपी नाही हे भारतीय संघाला दुसऱ्या डावात दाखवून दिले. पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली असताना देखील ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताला महागात पडल्याचे दिसत आहे.

भारताच्या दुसऱ्या डावात भारताचे चार फलंदाज अवघ्या 32 धावांवर माघारी परतले तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सचा गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागलां नाही. पहिल्या डावात शतक ठोकून भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणणाऱ्या चतेश्वर पुजारा तसेच विराट कोहली , अजिंक्य राहणे , सलामी चे फलंदाज स्वस्तात माघारी जाताना दिसले. त्यामुळे भारताचे ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळविण्याचे स्वप्न सध्या तरी भंगले आहे.

तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ५ बाद ५४ धावा अशा स्थितीत असून ३४६ धावांनी आघाडी वर आहे. भारताच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज हनुमा विहारी (१३) , पुजारा (०) , कोहली (०) , राहणे (१) तर रोहित शर्मा (५) यांची अशी घसरगुंडी पहायला मिळाली. तर अग्रवाल २८ तर पंत ६ धावांवर नाबाद खेळत आहेत. पॅट कमिन्स याने ४ महत्वाच्या ४ गडी बाद केले तसेच हेजलवूड याने १ गडी बाद केला.