fbpx

भारत वि. ऑस्ट्रेलिया : नाणेफेक जिंकत भारताने घेतला फलंदाजीचा निर्णय 

टीम महाराष्ट्र देशा : भारत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्डल्कपचा दुसरा सामना खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने या आव्हानात्मक सामन्यासाठी संघात कोणतेही बदल केले नाहीत. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर आज भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना आहे. त्यामुळे या विश्वचषकातले ऑस्ट्रेलिया हे भारतासाठी कडवे आव्हान असणार आहे. भारत आता या आव्हानाला कसा सामोरा जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारत विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघाने देखील अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी विश्वचषकातील महत्वपूर्ण सामन्यांपैकी एक ठरणार आहे.