भारताने अंतराळ क्षेत्रात घेतली मोठी भरारी; ‘मिशन शक्ती’ अवघ्या ३ मिनिटात यशस्वी..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. मोदींनी केलेल्या भाषणात ‘मिशन शक्ती’ अवघ्या ३ मिनिटात पूर्ण केल्याची  सर्वात मोठी घोषणा केली. भारताने ३०० किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ भारताने पूर्ण केलं.

अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे. ‘मिशन शक्ती हे अत्यंत अवघड होतं, वैज्ञानिकांनी लक्ष्य भेदलं, आम्हा सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे, मिशन शक्तीशी जोडलेल्या सर्व वैज्ञानिकांना सलाम’ अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी या मोहिमेशी संबंधित सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात देशाला महत्त्वपूर्ण संदेश देणार आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली होती.  महत्त्वाचं म्हणजे भाजप नेत्यांचे फोन बंद करण्यात आले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मुद्द्यावर बोलणार, याचे तर्क लढवण्यासही सुरुवातही झाली होती.