भारत टी-20 वर्ल्ड कप आयोजनाला मुकणार

भारत

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याचा परिणाम सर्वच स्तरावर पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह क्रीडाक्षेत्रहीलाही याचा फटका बसलेला दिसून येत आहे. आता या परिस्थितीचा परिणाम सहा महिने लांब असलेल्या टी-20 वर्ल्ड कपवर होताना दिसत आहेत.

यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  ही स्पर्धा दुसरीकडे हालवण्याची योजना आयसीसीने बनवली आहे. भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीचा ‘बॅक अप प्लॅन’ तयार असल्याचे आयसीसीचे सीईओ जेफ अलारडाईस यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

‘कोरोनामुळे भारतातील टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा दुसरीकडे खेळविण्यात येईल हे पक्के आहे. कारण सध्या तरी जगभरातील प्रत्येक देशांमध्ये कमीअधिक प्रमाणात कोरोना आहेच, पण तरीही श्रीलंका व यूएई हे पर्याय आयसीसीच्या दृष्टीने हितकारक ठरू शकतील. या दोन देशांपैकी एका ठिकाणी ही स्पर्धा खेळविण्यात येऊ शकते.’

महत्वाच्या बातम्या