भारताने गार्डियन ड्रोनची खरेदी केल्यामुळे अमेरिकेतील रोजगाराच्या संधीत वाढ

Guradian-drones

वॉशिंग्टन : भारताने अमेरिकेकडून दोन अब्ज डॉलर किंमतीच्या २२ गार्डियन ड्रोनची खरेदी केल्यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या २ हजार नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. याकारणामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी सुधारल्याचे सांगण्यात येत आहे.अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध दृढ करण्यासाठी गार्डियन ड्रोन चा करार महत्वाचा असल्याचे जनरल ऍटोमिक्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर या व्यवहाराची घोषणा करण्यात आली होती .