भारत दुस-या क्रमांकावर

धुम्रपान करणे हे आरोग्यास हानिकारक असते हे अनेक वेळेस आपल्याला सांगितलं जात. सिगारेटचं पाकीट असो किंवा जाहिरात असो अशा अनेक माध्यमातून जनजागृती केली जाते पण याचा पाहिजे तेवढा उपयोग होताना दिसून येत नाही.
नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार धुम्रपानामुळे 11 टक्के लोक जगभरात मृत्यूमुखी पडले आहेत आणि त्यातले 50% लोक हे चीन, भारत, अमेरिका आणि रशिया देशातले होते.
गेल्या काही वर्षात आरोग्याच्या समस्येमुळे जगभरात 64 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात 11% मृत्यू हे केवळ धुम्रपानामुळे झाले होते. मेडिकल जर्नल ऑफ ल्रन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चीनमध्ये धुम्रपान करणा-यांमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
अमेरिका आणि रशिया अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहे. जगातील एकूण धुम्रपान करणा-यांपैकी 11 % स्मोकर्स हे भारतात आहे. त्यातूनही पुरूषांची संख्या ही अधिक आहे.