अग्नी 5 क्षेपणास्त्राची  चाचणी यशस्वी; आता चीनही भारताच्या टप्प्यात 

बालासोर- भारतानं आज स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी परीक्षण केलं आहे.  20 मीटर लांबी आणि 50 टन वजन असलेले अग्नी 5 हे क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रंही वाहून नेऊ शकते. या क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची कामगिरी ट्रॅक करण्यात आली असून,रडार, उपकरणं आणि ऑब्जर्व्हेशन स्टेशन्सच्या माध्यमातून त्याला मॉनिटर करण्यात येतं.

अग्नी-5 या क्षेपणास्त्राची 5000 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता आहे. त्यामुळे आता चीन देखील भारताच्या टप्प्यात आलं आहे. ओडिशातल्या बालासोरमधील डॉ. अब्दुल कलाम केंद्रावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

अग्नी-5 क्षेपणास्त्र हे आतापर्यंत सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त आहे. अग्नी-5 हे क्षेपणास्त्र जमिनीवरूनच जमिनीवर यशस्वी मारा करू शकते. आतापर्यंत अग्नी-5चं परीक्षण जवळपास सहा वेळा करण्यात आलं आहे. प्रत्येक परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्रातील अंतर वाढवण्यात यश मिळालं आहे.