भारतान पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू नये, पाकिस्तानची विनवणी

Indian-Army-Surgical-Strike

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय लष्करी तळावरील हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत जैश ए महम्मदच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा भारताने आरोप केला आहे. त्यामुळे भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती पाकिस्तानला आहे. भारताने या दहशतवादी संघटनेवर हल्ला करण्याचे निमित्त दाखवून पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करु नये, असे पाककडून ध्वनित करण्यात आले आहे.

पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायाला विनवणी केली आहे. भारताला सर्जिकल स्ट्राइक्स करण्यापासून रोखाव. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानं एक स्टेटमेंट प्रसृत केले आहे. भारतामध्ये असे काही प्रकार घडले की भारतीय अधिकारी कुठलाही पुरावा नसताना बेजबाबदार वक्तव्ये करतात आणि चौकशी करण्याआधीच (पाकिस्तानवर) बेछुट आरोप करतात असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. दरम्यान, भारत व पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये संवाद होणं गरजेच असल्याचं मत जम्मू व काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, युद्ध हा काही पर्याय नसल्याचं सांगत दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्ग अवलंबायला हवा आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन करता कामा नये असंही त्या म्हणाल्या आहेत.

1 Comment

Click here to post a comment