एकदिवसीय सामन्यामध्ये भारत पराभूत

टीम महाराष्ट्र देशा : सिडनी येथे सुरु असलेल्या भारत – ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्या मध्ये भारतीय संघ  ३४ धावांनी पराभूत झाला. आक्रमक फलंदाज रोहित शर्मा झेलबाद झाल्यानंतर. भारताच्या विजयाबाबत शंका वाटू लागली होती. ऑस्ट्रेलियाच्या रिचर्डसन या उमद्या गोलंदाजान ४ विकेट घेतल्या , तर रोहित शर्माने  १३३ धावांची दमदार खेळी खेळली.

ऑस्ट्रेलियाने भारतला २८९ धावांचं आव्हान दिल होत. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एम एस धोनी आणि रोहित शर्मा वगळता बाकीचा संघ स्वस्तात तंबूत परतला. एम एस धोनीने या सामन्यात रोहित शर्माबरोबर  उत्तम भागीदारी करत ५१ धावा केल्या. रोहित शर्मा क्रीजवर असे पर्यंत भारतला सामना जिंकण्याची आशा होती पण रोहित  स्टोनीसच्या धीम्या गतीच्या चेंडूवर झेल बाद झाला. या सामन्यात भारतीय फलंदाजी ढासळल्याने ऑस्ट्रलियाने सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करून सहज विजय पदरात पाडून घेतला.

You might also like
Comments
Loading...