दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत भारताला विश्वविक्रम करण्याची संधी

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवून टीम इंडियाने विजयी सुरुवात केली. या सामन्यात विजय मिळवताच भारताने पाकिस्तान संघाच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला पाकिस्तानचा विक्रम प्रस्थापित करण्याची नामी संधी आहे.

पाकिस्तानने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध १२५ सामन्यात विजय मिळवले होते. यादरम्यान भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली. आता जर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर पाकिस्तानचा विक्रम मोडीत निघेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवताच श्रीलंकेवर सर्वाधीक विजय मिळवण्याच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेईल.

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध २३१ सामने खेळलेले आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत असुन भारताने २२३ सामने खेळलेले आहे. तर न्युझीलंडने श्रीलंकेविरुद्ध १५४ सामने खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने १४४ सामने खेळलेले आहेत. विजयाच्या टक्केवारीचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया संघ हा अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेविरुद्ध विजयाची टक्केवारी ६१.११ आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP